Wednesday, 17 August 2016

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा यालाच राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन असेही म्हणतात . समुद्रकाठी जे लोक राहतात ,ते प्रामुख्याने हा सण साजरा करतात . पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो . जलदेवतेचा कोप होऊ नये,जहाजे ,नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून जहाजे ,बोटी वगैरेची येरजा या काळात बंद असते .  या दिवसापासून समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात या दृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात . काही लोक नारळ अर्पण कराताना ताम्रनाणी नारळास बांधतात ,कोणी साधा नारळ समुद्रात सोडतात ,कोणी बेगडाचा नारळ समुद्रात सोडतात . या दिवशी बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी . भावाने बहिणीचे रक्षण करावे असा या राखी बांधण्याचा हेतू असतो . लोक याच दिवशी यज्ञपवीत (जानवे) धारण करतात . या दिवशी मुख्य पक्वान्न म्हणजे नारळीभात करावा . बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करावा . या दिवशी अंगणात ठिपक्यांची रांगोळी काढावी. 'रक्षाबंधन' म्हणून हा सण जास्त प्रख्यात आहे . 

No comments:

Post a Comment