Monday 28 November 2016

#Vaibhavlaxmi #Vrat / वैभवलक्ष्मी व्रत

॥ॐ र्‍हीं महालक्ष्मीदेव्यै नम:॥

आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुखसमाधान सतत रहावे, हा त्यामागील हेतू असतो. व्रत केल्याने उत्तमफलांचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा आरंभ करुन शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यावर श्रध्दा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. महालक्ष्मी व्रत नियम गुरुवारी प्रात:काळी उठावे. अंघोळ करावी. शुध्द अंत:करणाने व सश्रध्द भावनेने पूजाविधी करावा. दिवसभर उपवास करुन, सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे. कधी-कधी आकस्मिक अडचण उद्भवते; अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा- आरती करुन घ्यावी. एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाचे दिवशी गुरुवार असल्यास पक्त पूजा, आरती करावी. कहाणी स्वत: वाचावी अथवा ऎकावी. व्रताची पूजा व कहाणी ऎकण्यास शेजार्‍यांना निमंत्रण द्यावे. 
सायंकाळी गाईची पूजा करावी. तिला नैवेद्य द्यावा. नित्याप्रमाणे उद्यापनाचे दिवशी पूजा, आरती करावी. कहाणी वाचावी. सात सुवासिनींना वा सात कुमारिकांना हळदी-कुंकू द्यावे. एक-एक फळ व व्रताच्या कथेची एक-एक प्रत द्यावी. शक्य झाल्यास ब्राम्हणांना शिधा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा, आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरवात करावी. हे व्रत वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसर्‍या महिन्याचे पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरु करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी त्याचे उद्यापन करावे. हमखास यश लाभते.

No comments:

Post a Comment