Friday, 28 April 2017

Akshay_Tritiya / अक्षय_तृतीया





#अक्षय तृतीया विशेष
         २८तारखेला  अक्षय तृतीया आहे. परंतु काहींचा लगेच प्रश्न असतो कि गुरुजी म्हणजे काय? कारण तृतीया तर दर महिन्याला येते हो मग याच तृतीयेचे इतके महत्व काय बर?  "अक्षय "या शब्दाचा अर्थ काय? हे असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतात म्हणून किमान या लेखातुन अक्षय तृतीयेची थोडीफार तरी माहिती आपणास होईल म्हणुन हा लेख आपणा समोर सादर करतोय .        वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.
       अक्षय्य तृतीया हे
#व्रत कसे करावे? या दिवशी  व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे #पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे. 
उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात.      स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या #गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात. अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?
हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे. या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.       अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?या तिथीस केलेले दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा
#मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते.
मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll3) भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: llया दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.विशेष सूचना - कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते.तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड, अक्षय सुख, समृद्धी नांदो. 

Saturday, 11 March 2017

#होळी_पौर्णिमा" #Holi_Pornima #होलिकोत्सव #Holikostov #धूलिकोत्सव #Dhulikostva #रंगोत्सव #Rangostva #रंगपंचमी #Rangpanchami #होलिकादहन" #Holikadahan #शिमगा" #Shimga "#हुताशनी_महोत्सव" #Hutashani_mahostva #वसंतोत्सव" #Vasantosva ‘#शिमगा’ #Shimga #फाल्गुनोत्सव" #Falgunostva

     


   #होळी  

         संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला "#होळी_पौर्णिमा" असेही संबोधले जाते. #होलिकोत्सव, #धूलिकोत्सव आणि #रंगोत्सव म्हणजे होळी,   धूळवड #रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून  पंचमीपयर्त या - दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.   भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक #लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला"#होलिकादहन" किंवा "होळी", "#शिमगा", "#हुताशनी_महोत्सव","#दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "#फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमना निमित्त"#वसंतागमनोत्सव" किंवा "#वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनचशिमगाअसा अपभ्रंश तयार झाला असावा .  
         महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीचे महत्त्व होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.
        होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात . दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात.ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहेथंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.
             भारतीय होळीचे ऐतिहासिक चित्र लहान मुलांना पीडा देणाऱ्या"होलिका","ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीच ाश्रीविष्णूदेवाने वध केला होता. होलिकेलावर होत की तिला अग्नि जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत प्रवेश केला प्रल्हाद बचावला होलिकेचे दहन झाले) "मदनदहना"च्या कथेत ह्या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा.
          आजच्या लोकोत्सवात "होलिकोत्सव" (होळी), "धूलिकोत्सव"धूळवडआणि "रंगोत्सव"रंगपंचमीहे तीन मुख्य पदर उठून दिसतात. जडवाद आणि भोगवाद ह्यांना जाळून, त्यांची धूळवड करून आयुष्यातल्या आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा किंवा समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून त्यांच्या नावाने"शिमगा" करत सदवृत्तींचा जयघोष करायचा हा उत्सव आहे.
        कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव कोकणात विशेषतः रत्नागिरीजिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो.पालखी मुख्य #विधी यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशाच्या गजरात सहाणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. प्रसंगी सुमारे ५० ते ७० फूट उंचीचे, अंदाजे १५ वर्षे वयाचे, आणि सुमारे १२०० ते १५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत सहाणेवर पालखीसमोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत पहाट होते. मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट ज्या खड्ड्यात शिल्लक असतो, तोच खड्डा मोठा खणून त्यात होळीसाठी आणलेले झाड उभे करतात , त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षिणा होते, आणि मग #होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात.गार्हाणे, खुणा काढणेदुसर्या दिवशी गावकरी परत सहाणेवर जमतात. तिथे होळीच्या शेंड्याखाली सगळं गाव उभा राहून ~गार्हाणे ~ नावाचा कार्यक्रम होतो,ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक(गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.त्यानंतर तिसर्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा #कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो . तो नारळ पालखी हुडकून काढते. हा कार्यक्रम पाहण्यासाठीही गर्दी होते.समारोप त्यानंतर #सत्यनारायणपूजा आणि भजन रात्री गावचे खेळे-नमन हालोक नृत्यप्रकारअसतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या #गोंधळ घालून होते.
रंगपंचमीफाल्गुन कृष्ण पंचमी यातिथीला रंगपंचमीहा सण साजरा केला जातो.धुलीवंदना पासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.
#होळी #Holi  #होळी_पौर्णिमा" #Holi_Pornima #होलिकोत्सव  #Holikostov #धूलिकोत्सव #Dhulikostva #रंगोत्सव #Rangostva #रंगपंचमी #Rangpanchami #होलिकादहन" #Holikadahan #शिमगा" #Shimga "#हुताशनी_महोत्सव" #Hutashani_mahostva #वसंतोत्सव" #Vasantosva ‘#शिमगा’ #Shimga #फाल्गुनोत्सव" #Falgunostva



Tuesday, 21 February 2017

#Mahashivratri/ #महाशिवरात्र #Lord_Shiva #Laghurudra_Abhishek #लघुरूद्र_अभिषेक #Poojasahitya #Online_book_pandit





                    #महाशिवरात्र


          " सर्वदेवात्मको रुद्र: सर्वे देवा: शिवात्मका: " 
     माघ महिन्यातील अत्यंत महत्वाचा पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र, ही माघ महिन्यात वद्य चतुर्दशीला येते याबाबत पुराणामध्ये एक कथा प्रचलीत आहे.
 
        विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी राहत होता तो शिकार करून आपल्या बायकोमुलांचे पालन पोषण करीत असे. एके दिवशी हरणांची शिकार करण्यासाठी व्याध एका झाडावर लपून बसला होता. झाडांच्या पानंमुळे काही दिसत नव्हते म्हणून तो एक एक पान तोडूनखाली टाकू लागला आणि योगायोग असा की त्या झाडाखाली शिवाचे मंदिर होते ते झाड बेलाचे होते.रात्री एक हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली व्याधाला तिची चाहूल लागली.व्याध बाण सोडणार तितक्यात त्या हरिणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले ती त्याला म्हणाली अरे व्याधा जरा थांब! मला मारू नकोस कारण माझी पाडसे घरी वाट पाहत असतील त्यांची भेट घेऊन येते मग मार. त्या शिकाऱ्याने तिचे म्हणणे कबूल केले. व्याधाला दया आली त्याने तो विचार सोडून दिला. त्या दिवशी व्याधा कडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक झाला होता, शिकार मिळाल्यामुळे उपवास घडला होता. यामुळेत्याने दाखविलेल्या दयेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व्याधाला हरिणीलाबछड्यासह त्यांनी स्वर्गात स्थान दिले म्हणून हा दिवस महाशिवरात्र म्हणून मानण्यात येऊ लागला.आजही तो व्याध आणि कळपांच्या म्होरक्या(प्रमुख) मृग हे नक्षत्राच्या रूपाने आकाशात रात्री चमकताना दिसतात.
 
       शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष महादेव असे नामस्मरण करून भाविकचराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावरभाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते.'आशुतोष' म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्या शिवाला 'नीळकंठ' असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा चंद्र यांचेस्थान आहे. म्हणून त्यांना 'त्र्यंबकेश्वर' असेही म्हणतात. ' नमः शिवाय' या मंत्रामध्ये सर्व प्रकारचेदु: नष्ट करण्याची शक्ती आहे.'शिव' म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा 'नमः' हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे.  'नम: शिवाय' या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठीसार्थ ठरला आहे.
 शिवाला बेलपत्र प्रिय:
एका कथेनुसार...
       एकदा विष्णुची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्याचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्मीने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले तेव्हापासून शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे.
 
     या दिवशी केलेल्या अभिषेकामुळे जातकांच्या पत्रिकेत कष्ट देणारे ग्रह देखील शुभ फल प्रदान करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक राशीच्या जातकांसाठी उपाय सांगितले आहे.
 मेष- मध, गूळ, उसाचा रस, लाल फूल वाहावे.
वृषभ- कच्चे दूध, दही, पांढरे फूल.
मिथुन- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र.
कर्क- कच्चे दूध, लोणी, मूग, बिल्वपत्र.
 सिंह- मध, गूळ, साजुक तूप, लाल फूल.
कन्या- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र, हिरवे निळे फूल. तूळ- दूध, दही, तूप, लोणी, खडीसाखर.
वृश्चिक-मध, साजुक तूप, गूळ, बिल्वपत्र, लाल पुष्प.
धनू- साजुक तूप, मध, खडीसाखर, बदाम, पिवळे फूल, पिळवे फळ.
मकर- सरसोचे तेल, तिळाच तेल, कच्चे दूध, निळे फूल.
 कुंभ- कच्चे दूध, सरसोचे तेल, तिळाचं तेल, निळे फूल.
मीन- ऊसाचा रस, मध, बादाम, बिल्वपत्र, पिवळे फूल, पिळवे फळ.
 यजुर्मयो हृदयं देवो यजुर्भिः शत्रुद्रियैः।पूजनीयो महारुद्रो सन्ततिश्रेयमिच्छता।।जलेन वृष्टिमाप्नोति व्याधिशांत्यै कुशोदकैदध्ना पशुकामाय श्रिया इक्षुरसेन वै।मध्वाज्येन धनार्थी स्यान्मुमुक्षुस्तीर्थवारिणा।पुत्रार्थी पुत्रमाप्नोति पयसा चाभिषेचनात।।बन्ध्या वा काकबंध्या वा मृतवत्सा यांगना।जवरप्रकोपशांत्यर्थम् जलधारा शिवप्रिया।।घृतधारा शिवे कार्या यावन्मन्त्रसहस्त्रकम्।तदा वंशस्यविस्तारो जायते नात्र संशयः।प्रमेह रोग शांत्यर्थम् प्राप्नुयात मान्सेप्सितम।केवलं दुग्धधारा वदा कार्या विशेषतः।शर्करा मिश्रिता तत्र यदा बुद्धिर्जडा भवेत्।श्रेष्ठा बुद्धिर्भवेत्तस्य कृपया शङ्करस्य !!सार्षपेनैव तैलेन शत्रुनाशो भवेदिह!पापक्षयार्थी मधुना निर्व्याधिः सर्पिषा तथा।।जीवनार्थी तू पयसा श्रीकामीक्षुरसेन वै।पुत्रार्थी शर्करायास्तु रसेनार्चेतिछवं तथा।महलिंगाभिषेकेन सुप्रीतः शंकरो मुदा।कुर्याद्विधानं रुद्राणां यजुर्वेद्विनिर्मितम्।
  • पाण्याने रूद्राअभिषेक केल्यास:-  जलवृष्टी होते.
  • कुशोदकाने  अभिषेक केल्यास -  रोग, दु:ख नाहीसे होते. .
  • दह्याने रूद्राअभिषेक केल्यास - पशु, गृह तसेच वाहन यांचीप्राप्ती होते.
  • उसाच्या रसाने अभिषेक केल्यास - लक्ष्मीची प्राप्ती होते. 
  • मध घातलेल्या पाण्याने रूद्राअभिषेक केल्यास - धनवृद्धी होते
  • तीर्थाने अभिषेक केल्यास -मोक्षप्राप्ती होते.
  • अत्तर घातलेल्या पाण्याने अभिषेक केल्यास  व्याधी नष्ठ होतात.
  • दुधाने अभिषेक केल्यास -पुत्र प्राप्ती होते, प्रमेह रोग शांत होतो, मनोकामना पूर्ण होतात.
  • गंगाजलाने अभिषेक केल्यास - ज्वर ठीक होतो.
  • दुध व साखर यांच्या मिश्रणाने अभिषेक  केल्यास - सद्सदविवेकबुद्धी प्राप्त होते.
  • तुपाने रूद्राअभिषेक केल्यास - वंशविस्तार होतो.
  • तुपाने रूद्राअभिषेक केल्यास -रोग /क्षत्रुचा नाश होतो.
  • शुद्ध मधाने रूद्राअभिषेक केल्यास - पापक्षालन होते.
महाशिवरात्रीला वरील पदार्थांनी महादेवाचे रूद्राअभिषेक करून ईच्छित फळ मिळवता येतेमाहादेवांचे माहाशिवरात्री दिवशी करण्याची सेवा   सांबसदाशिव पूजा   #रूद्रभिषेक   #लघुरूद्र   #महारूद्र