#Mahashivratri/ #महाशिवरात्र #Lord_Shiva #Laghurudra_Abhishek #लघुरूद्र_अभिषेक #Poojasahitya #Online_book_pandit
#महाशिवरात्र
" सर्वदेवात्मको रुद्र : सर्वे देवा :
शिवात्मका : " माघ महिन्यातील
अत्यंत महत्वाचा व पवित्र
दिवस म्हणजे महाशिवरात्र ,
ही माघ महिन्यात
वद्य चतुर्दशीला येते
याबाबत पुराणामध्ये एक कथा
प्रचलीत आहे . विंध्य पर्वताच्या घनदाट
अरण्यात एक शिकारी
राहत होता तो
शिकार करून आपल्या
बायकोमुलांचे पालन पोषण
करीत असे . एके
दिवशी हरणांची शिकार
करण्यासाठी व्याध एका झाडावर
लपून बसला होता .
झाडांच्या पानंमुळे काही दिसत
नव्हते म्हणून तो एक
एक पान तोडूनखाली
टाकू लागला आणि
योगायोग असा की
त्या झाडाखाली शिवाचे
मंदिर होते व
ते झाड बेलाचे
होते . रात्री एक
हरिणी पाणी पिण्यासाठी
तिथे आली व्याधाला
तिची चाहूल लागली . व्याध बाण सोडणार
तितक्यात त्या हरिणीचे
लक्ष त्या शिकाऱ्याकडे
गेले व ती
त्याला म्हणाली अरे व्याधा
जरा थांब ! मला
मारू नकोस कारण
माझी पाडसे घरी
वाट पाहत असतील
त्यांची भेट घेऊन
येते मग मार .
त्या शिकाऱ्याने तिचे
म्हणणे कबूल केले .
व्याधाला दया आली
त्याने तो विचार
सोडून दिला . त्या
दिवशी व्याधा कडून
शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक
झाला होता , शिकार
न मिळाल्यामुळे उपवास
घडला होता . यामुळेत्याने
दाखविलेल्या दयेमुळे भगवान शंकर
प्रसन्न झाले व
व्याधाला हरिणीलाबछड्यासह त्यांनी स्वर्गात स्थान
दिले म्हणून हा
दिवस महाशिवरात्र म्हणून
मानण्यात येऊ लागला . आजही तो
व्याध आणि कळपांच्या
म्होरक्या ( प्रमुख ) मृग हे
नक्षत्राच्या रूपाने आकाशात रात्री
चमकताना दिसतात . शिवशंकराला देवांचा देव महादेव
मानतात . महादेवाचे मंदिर नाही ,
असे गाव भारतात
शोधून देखील सापडणार
नाही . देशभरातील प्रत्येक
प्रांतात शिवशकंराची आराधना केली
जाते . ' हर हर
महादेव ...', अशा जयघोषात
शिवाचे भाविक तल्लीन होऊन
जातात . सदाशिव , सांब , महेश ,
मंगेश , गिरिजापती , पार्वतीपती , भूतनाथ ,
नीलकंठ , चंद्रमौली , आशुतोष व
महादेव असे नामस्मरण
करून भाविकचराचरात सामावलेल्या
शिवशंकराचा धावा करीत
असतात . शिव हे
दैवत मंगलमय , कल्याण
करणारे असून त्यांच्यावरभाविकांची
अपार श्रध्दा आहे .
शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे
दुःख येत नाही ,
अशी श्रद्धा आहे .
ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे .
विष्णू सृष्टीचा पालनकर्ता . शंकर
तिचे संरक्षण करणारा
आहे . यामुळेच भोलेनाथाला
' कैलासनिवासी ' असे म्हटले
जाते .' आशुतोष ' म्हणचे
तत्काळ संतुष्ट होणारे . शिव
तसाच आहे . समुद्र
मंथनात निघालेले विष स्वत :
प्राशन करून जगाचे
कल्याण करणार्या शिवाला ' नीळकंठ '
असेही संबोधले जाते .
शिवाच्या मस्तकावर गंगा व
चंद्र यांचेस्थान आहे .
म्हणून त्यांना ' त्र्यंबकेश्वर ' असेही
म्हणतात . ' ॐ नमः
शिवाय ' या मंत्रामध्ये
सर्व प्रकारचेदु : ख
नष्ट करण्याची शक्ती
आहे .' शिव ' म्हणजे
पापाचा नाश करणारे ,
त्या आधी असणारा
' नमः ' हा शब्द
मोक्ष प्रदान करणारा
आहे . ' नम :
शिवाय ' या पाच
अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य
असून तो जगाचे
कल्याणासाठीसार्थ ठरला आहे . शिवाला बेलपत्र प्रिय : एका कथेनुसार ... एकदा विष्णुची पत्नी
लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर
प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले
वाहण्याचे व्रत करण्याचे
ठरविले . लक्ष्मीने परडीत मोजून
कमळे ठेवली . मात्र
मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची
फुले कमी भरली .
त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले .
त्यानंतर तिने फुलांवर
पाणी शिंपडले आणि
चमत्कार झाला . फुलांमधून एक
रोपटे बाहेर आहे .
त्याला त्रिदलासारखी पाने त्याला
होती . ते बेलाचे
रोपटे होते . त्यावरील
बेलपत्र लक्ष्मीने तोडून शिवलिंगवर
वाहिली . लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य
पाहून भोलेनाथ प्रसन्न
झाले व तेव्हापासून
शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे . या दिवशी
केलेल्या अभिषेकामुळे जातकांच्या पत्रिकेत
कष्ट देणारे ग्रह
देखील शुभ फल
प्रदान करतात . महादेवाला प्रसन्न
करण्यासाठी प्रत्येक राशीच्या जातकांसाठी
उपाय सांगितले आहे . मेष -
मध , गूळ , उसाचा
रस , लाल फूल
वाहावे . वृषभ - कच्चे दूध , दही ,
पांढरे फूल . मिथुन - हिरव्या रंगांच्या फुलांचा
रस , मूग , बिल्वपत्र . कर्क - कच्चे दूध , लोणी ,
मूग , बिल्वपत्र . सिंह -
मध , गूळ , साजुक
तूप , लाल फूल . कन्या - हिरव्या रंगांच्या फुलांचा
रस , मूग , बिल्वपत्र ,
हिरवे व निळे
फूल . तूळ - दूध ,
दही , तूप , लोणी ,
खडीसाखर . वृश्चिक - मध , साजुक
तूप , गूळ , बिल्वपत्र ,
लाल पुष्प . धनू - साजुक तूप , मध ,
खडीसाखर , बदाम , पिवळे फूल ,
पिळवे फळ . मकर - सरसोचे तेल , तिळाच
तेल , कच्चे दूध ,
निळे फूल . कुंभ -
कच्चे दूध , सरसोचे
तेल , तिळाचं तेल ,
निळे फूल . मीन - ऊसाचा रस , मध ,
बादाम , बिल्वपत्र , पिवळे फूल ,
पिळवे फळ . यजुर्मयो हृदयं देवो यजुर्भिः
शत्रुद्रियैः।पूजनीयो महारुद्रो सन्ततिश्रेयमिच्छता।। जलेन वृष्टिमाप्नोति व्याधिशांत्यै कुशोदकैदध्ना च पशुकामाय
श्रिया इक्षुरसेन वै।मध्वाज्येन धनार्थी
स्यान्मुमुक्षुस्तीर्थवारिणा।पुत्रार्थी
पुत्रमाप्नोति पयसा चाभिषेचनात।।बन्ध्या
वा काकबंध्या वा
मृतवत्सा यांगना।जवरप्रकोपशांत्यर्थम् जलधारा शिवप्रिया।।घृतधारा शिवे
कार्या यावन्मन्त्रसहस्त्रकम्।तदा वंशस्यविस्तारो जायते नात्र संशयः।प्रमेह
रोग शांत्यर्थम् प्राप्नुयात
मान्सेप्सितम।केवलं दुग्धधारा च वदा
कार्या विशेषतः।शर्करा मिश्रिता तत्र यदा
बुद्धिर्जडा भवेत्।श्रेष्ठा बुद्धिर्भवेत्तस्य कृपया शङ्करस्य च !! सार्षपेनैव तैलेन शत्रुनाशो
भवेदिह ! पापक्षयार्थी मधुना निर्व्याधिः सर्पिषा
तथा।।जीवनार्थी तू पयसा
श्रीकामीक्षुरसेन वै।पुत्रार्थी शर्करायास्तु रसेनार्चेतिछवं तथा।महलिंगाभिषेकेन सुप्रीतः शंकरो मुदा।कुर्याद्विधानं
रुद्राणां यजुर्वेद्विनिर्मितम्।
पाण्याने रूद्राअभिषेक केल्यास:- जलवृष्टी होते.
कुशोदकाने अभिषेक केल्यास - रोग, दु:ख नाहीसे होते. .
दह्याने रूद्राअभिषेक केल्यास - पशु, गृह तसेच वाहन यांचीप्राप्ती होते.
उसाच्या रसाने अभिषेक केल्यास - लक्ष्मीची प्राप्ती होते.
मध घातलेल्या पाण्याने रूद्राअभिषेक केल्यास - धनवृद्धी होते
तीर्थाने अभिषेक केल्यास -मोक्षप्राप्ती होते.
अत्तर घातलेल्या पाण्याने अभिषेक केल्यास व्याधी नष्ठ होतात.
दुधाने अभिषेक केल्यास -पुत्र प्राप्ती होते, प्रमेह रोग शांत होतो, मनोकामना पूर्ण होतात.
गंगाजलाने अभिषेक केल्यास - ज्वर ठीक होतो.
दुध व साखर यांच्या मिश्रणाने अभिषेक केल्यास - सद्सदविवेकबुद्धी प्राप्त होते.
तुपाने रूद्राअभिषेक केल्यास - वंशविस्तार होतो.
तुपाने रूद्राअभिषेक केल्यास -रोग /क्षत्रुचा नाश होतो.
शुद्ध मधाने रूद्राअभिषेक केल्यास - पापक्षालन होते.
महाशिवरात्रीला वरील पदार्थांनी
महादेवाचे रूद्राअभिषेक करून ईच्छित
फळ मिळवता येते माहादेवांचे माहाशिवरात्री दिवशी करण्याची सेवा सांबसदाशिव
पूजा #रूद्रभिषेक # लघुरूद्र # महारूद्र
No comments:
Post a Comment