Friday, 12 August 2016

श्री संतोषीमातेचे व्रत (शुक्रवार )

                           श्री  संतोषीमातेचे व्रत (शुक्रवार )

चातुर्मास सुरुवात झाली की हे व्रत (vrat) करण्यास सुरवात करावी .या देवीचे व्रत कोणी चार महिने करतात . कोणी एक वर्ष करतात . कोणी तीन वर्षे करतात . हे व्रत दर शुक्रवारी करावे . व्रत केलेल्या स्त्रीने या दिवशी नहावे , उपवास करावा . कोणी एक एकवेळ जेवण करून उपवास करतात  कोणी काहीही न खाता नुसत्या गुळ फुटाण्यावर उपवास सोडतात. या दिवशी घरात कोणीही आंबट खाऊ नये ( ताक , लिंबु ,आमसुल ,दही ,चिंच ) इत्यादि. देवीला गुळ फुटण्याचा नैवेद्य दाखवावा . संतोषीमातेचे देवीचे चित्र घ्यावे .  पाटावर रांगोळी काढुन त्यावर चित्र ठेवावे. तांदळाचे चार दाणे पाटावर पसरून त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा . तांब्यावर पाच विड्याची पाने ठेवावीत . त्यावर वाटी किंवा भांडे ठेवुन त्यात गुळ व फुटाणे ठेवावीत . प्रथम तांब्याची गंध , फुल ,अक्षता ,हळद ,कुंकू ,यांनी पुजा करावी . तसेच नारळाची पण वरीलप्रमाणे पुजा करावी . नंतर देवीची पुजा करावी ,हार घालावा , दुध ,गुळ ,फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा . हातात गुळ व फुटाणे घेऊन मंत्र म्हणावा . गाईला तो प्रसाद म्हणून खावयास द्यावा व उरलेले गुळ व फुटाणे घरातील सर्वाना प्रसाद म्हणुन द्यावा . संतोषीमातेची आरती करावी .कहाणी वाचावी .एक सवाष्ण व एक कुमारिका जेवण्यास सांगावी . अशाप्रकारे संतोषीमातेचे केलेलें व्रत खूप फलदायी असते”  

No comments:

Post a Comment