Monday, 30 January 2017

#गणेशजयंती #गणेशयाग #Ganesh_Yag #सहस्रआवर्तने #Sahastravartan


#गणेशजयंती 

              माघी "गणेश चतुर्थी" संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते.या दिवशी गणेश तत्त्व नेहमीपेक्षा सहस्रपट जास्त असते. व त्यामुळे सर्व गणेशभक्त वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गणेशाची आराधना व उपासना इत्यादी करतात. या दिवशी गणेशाला विशेषकरुन तीळचे लाडु व विविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.या गणेशजन्मोत्सवासंदर्भात पुराणामध्ये एक कथा आढळते. ती याप्रमाणे एकदा देवतांवर संकट आलेले असताना सर्व देव महादेवांजवळ गेले व त्या संकटापासुन सोडवण्याची विनंती करू लागले . तेव्हा तेथे कार्तिकेय स्वामी व गणेश उपस्थित होते,महादेवांनी त्यांना विचारले कि या संकटाचे निवारण करण्यासाठी कोण समर्थ आहे त्यावर कार्तिकेय स्वामी व #गणेश म्हणाले कि आम्ही दोघेही या संकटाचे निवारण करण्यासाठी समर्थ आहोत आज्ञा असावी . तेव्हा महादेवाना प्रश्न पडला आता काय करावे ? तेव्हा नारद महादेवाना म्हणाले आपण यांची परीक्षा घेऊ  की या  दोघांपैकी जो पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा पूर्ण करून सर्वप्रथम येथे  येईल त्याला आपण ही संधी देऊ,हे ऐकताक्षणी कार्तिकेय स्वामी आपल्या मयुर वाहनावर बसले व प्रदक्षिणेसाठी निघुन गेले गणेसाने विचार केला कि आपले माता पिता हेच आपली पृथ्वी आहेत असे स्मरून आपल्या माता पित्याला तीन प्रदक्षिणा करून त्यांच्या चरणकमलावरती  नतमस्तक झाले  त्यांचे हे बौद्धिक चातुर्य  पाहून महादेव नारद ऋषी व इतर सर्व देवगण प्रसन्न झाले  व ही संधी गणेशांना द्यावी असे सर्वानुमते ठरले  गणेशांनी  या संधीचा योग्य विनियोग करत देवतांवरचे संकट दूर केले.त्यानी केलेल्या या पराक्रमाचा सन्मान म्हणून त्या दिवसापासुन कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी सर्व कार्यारंभी गणेशांचे पूजन केले जाते. या दिवशी गणेशाला उद्देशुन सर्व संकटांपासुन रक्षण व्हावे व बालकाना विद्याभ्यासामध्ये सुयश प्राप्त व्हावे व सर्व मनोरथ पूर्ण व्हावे या उद्देशाने अथर्वशीर्षाची "सहस्रआवर्तने गणेशयाग" इत्यादी स्वरूपामध्ये गणेशाची सेवा केली जाते


No comments:

Post a Comment