Friday, 19 August 2016

श्रावण शुक्रवार

“श्रावण शुक्रवार”पुजा विधी (pooja vidhi):


               श्रावण(Shravan) महिन्यातील चारही ‘शुक्रवारी’ बायकांना हळदी-कुंकू देऊन दुध साखर व फुटाणे द्यावेत . प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे . एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी . तिला दक्षिणा द्यावी . देवतांची पुजा करावी . हळद -कुंकू , फुले ,आघाडा ,दुर्वा ,गंध लावुन “जिवतीची” पुजा करावी . पुराणाचे ५/७/९ असे दिवे करून जिवतीची आरती करावी .

स्वयंपाक (cooking) :


    मुख्य म्हणजे पुरण घालावे ,तळण ,खीर ,व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच करावा . सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी . देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा . जेवण्यास बसण्यापुर्वी  पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा . जेवण झाल्यावर सवाष्णींची खण नारळाने ओटी भरावी .

मुलांना औक्षण :


         जिवतीची पुजा (Pooja) करून आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे . परगावी जर आपले मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून चारी दिशेला अक्षता टाकाव्यात . समई ला जशी वात असते तशी औक्षणाच्या दिव्याची वात असावी , फुलवात असू नये . देवीच्या देवळात देवीचे दर्शन घेऊन तिच्यापुढे शिधा अर्पण करावा व आपल्या अपत्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी.


No comments:

Post a Comment