Showing posts with label shravan. Show all posts
Showing posts with label shravan. Show all posts

Tuesday, 23 August 2016

mangalagaur

मंगळागौरी व्रताचा शास्त्रार्थ

 हे व्रत विवाह झालेल्या स्त्रियांनी पतीच्या आयुष्यवृद्धीसाठी लग्नानंतर  पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी करावे . स्नान करून मंगळागौरी देवीचे षोडशोपचाराने पूजन करावे व कणकेच्या (गव्हाच्या पिठाच्या) सोळा दिव्यांनी आरती करावी . ब्राह्मण ,सुवासिनी व माता यांना सौभाग्यवान दयावे . आरती करता केलेले दिवे प्रसाद म्हणून भक्षण करावे व अळणी खावे.  संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवाला  बोलवावे . हळद ,कुंकू ,विड्याची पाने ,सुपारी व हातावर थोडी साखर द्यावी . सवाष्णीच्या गव्हाने ओटी भरावी . रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणावी . रात्रभर पुन्हा "मंगळागौर" जागवावी . त्यावेळी उखाणे ,फुगड्या ,गाणी ,भेंड्या लावाव्यात ,आपआपल्या पतींची नावे घेण्याचा कार्यक्रम करावा .निरनिराळे खेळ खेळावेत.आजकालच्या धावपळीच्या जीवनात या सांस्कृतिक परंपरा जपणे अशक्य झाले आहे म्हणूनच , We are at poojaandsahitya.com  providing  our best services in Poojasahitya and Online Booking of Pandit for Pooja on the occasion of "Shravan" and especially for Mangalagaur u can book paramparik khel for more information visit us at poojaandsahitya.com



Monday, 22 August 2016

Shravan_Laghurudra Abhishek

लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी स्त्रियांनी शिवामूठ वहावयाची पद्धत आहे . चारी सोमवारी स्त्रियांनी उपवास  करावा. स्नान करून तांदुळ , सुपारी , गंध ,फुल ,दोन बेलाची पाने महादेवाला वाहून पुजा करावी . हातात तांदूळ घ्यावे व ते तीनवेळेस महादेवावर वहावे . पहिल्या सोमवारी तांदूळ , नंतर तीळ ,नंतर च्या सोमवारी मुग ,चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आलाच तर सातू शिवामुठीसाठी घ्यावेत . दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी स्नान करून महादेवाला बेल वाहून उपवास सोडावा . धान्य निवडून व स्वच्छ धुवून वाळवून मग महादेवाला वहावे .शक्य असल्यास लघुरुद्राचा अभिषेक करावा .

Friday, 19 August 2016

श्रावण शुक्रवार

“श्रावण शुक्रवार”



पुजा विधी (pooja vidhi):


               श्रावण(Shravan) महिन्यातील चारही ‘शुक्रवारी’ बायकांना हळदी-कुंकू देऊन दुध साखर व फुटाणे द्यावेत . प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे . एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी . तिला दक्षिणा द्यावी . देवतांची पुजा करावी . हळद -कुंकू , फुले ,आघाडा ,दुर्वा ,गंध लावुन “जिवतीची” पुजा करावी . पुराणाचे ५/७/९ असे दिवे करून जिवतीची आरती करावी .

स्वयंपाक (cooking) :


    मुख्य म्हणजे पुरण घालावे ,तळण ,खीर ,व बाकीचा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच करावा . सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी . देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा . जेवण्यास बसण्यापुर्वी  पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा . जेवण झाल्यावर सवाष्णींची खण नारळाने ओटी भरावी .

मुलांना औक्षण :


         जिवतीची पुजा (Pooja) करून आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे . परगावी जर आपले मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून चारी दिशेला अक्षता टाकाव्यात . समई ला जशी वात असते तशी औक्षणाच्या दिव्याची वात असावी , फुलवात असू नये . देवीच्या देवळात देवीचे दर्शन घेऊन तिच्यापुढे शिधा अर्पण करावा व आपल्या अपत्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी.