Monday 22 August 2016

Shravan_Laghurudra Abhishek

लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी स्त्रियांनी शिवामूठ वहावयाची पद्धत आहे . चारी सोमवारी स्त्रियांनी उपवास  करावा. स्नान करून तांदुळ , सुपारी , गंध ,फुल ,दोन बेलाची पाने महादेवाला वाहून पुजा करावी . हातात तांदूळ घ्यावे व ते तीनवेळेस महादेवावर वहावे . पहिल्या सोमवारी तांदूळ , नंतर तीळ ,नंतर च्या सोमवारी मुग ,चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आलाच तर सातू शिवामुठीसाठी घ्यावेत . दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी स्नान करून महादेवाला बेल वाहून उपवास सोडावा . धान्य निवडून व स्वच्छ धुवून वाळवून मग महादेवाला वहावे .शक्य असल्यास लघुरुद्राचा अभिषेक करावा .

No comments:

Post a Comment