Thursday, 8 September 2016

Gauri Pooja/ " गौरीपूजन "

     गौरीपूजन 

           गौरीचे दोन मुखवटे असतात . एकीला ज्येष्ठा आणि दुसरी कनिष्ठा असे म्हणतात. गौरी आणण्याकरिता दोन सवाष्णी बोलवाव्यात . गौरी आणण्यापुर्वी प्रथम पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून गौरी ठेवाव्यात .त्यांच्या अंगावर नविन खण घालावे .त्यांना हळद-कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा . गौरी ज्या दिवशी आणावयाच्या असतील त्या ठिकाणी रांगोळीने पाऊले काढावी.पंचांगातील शुभ मुहूर्तावर गौरी आणाव्यात. गौरी आणतेवेळी " गौरी कशाच्या पावलांनी आली... गौरी मोत्यांच्या पावलांनी आली असे म्हणत गौरी आणाव्यात.गौरी माजघरातील उंबरठ्यापासून माप धान्य भरून ठेवावे व ते दोन्ही बायकांनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरींसहित माप ओलांडावे ,व नंतर त्या जागेवर बसवाव्यात.गौरीच्या पोटात आठ पदरी व सोळा पदरी असे दोन दोरे घ्यावेत व त्याला प्रत्येकी आठ आणि सोळा गाठी दयाव्यात.ते हळदीत बुडवून पिवळे करून वाळवावेत .व दोन्ही दोर एकत्र करून गळ्यात घालावे .
                गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी भरावी.खोबऱ्याची वाटी ,एखादे फळ ,कुंकवाचे दोन करंडे ठेवावेत . काही बायका गौरी पुढे लाडू,करंजी ,चकल्या ठेवतात. गौरीपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू ,गंध ,फुल आघाडा ,दुर्वा वस्त्र या पूजा साहित्यांनी करावी.त्या दिवशी सवाष्णींना हळदी कुंकवास बोलवावे .दुसऱ्या दिवशी पुरण  घालून नैवेद्य करावा. गौरी जेवल्यावर गौरी पुढे पानाचे विडे ठेवावेत.तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून आरती करावी. असे हे गौरीपूजनाचे व्रत केल्याने अक्षय सुख समृद्धी संपत्ती मिळते 

                             We are poojaandsahitya.com providing you pooja sahitya kit for Gauri pooja and Online booking of Pandit/ Guruji with your convenient time.


No comments:

Post a Comment