Thursday, 25 August 2016

गोकुळ अष्टमी चे मह्त्व जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

“कृष्णजन्माष्टमी”




भगवान श्रीकृष्णाने धर्माचे रक्षण करण्याकरिता  यादिवशी रात्री जन्म घेतला . तो  दिवस म्हणजेच गोकुळ अष्टमी”(Gokul Ashtami) होय . श्रीकृष्णाचे आपणाला वरचेवर स्मरण व्हावे म्हणुन सर्व ठिकाणी “गोकुळ अष्टमी” हा सण उत्साहाने साजरा करतात . ज्यांच्या घरी “गोकुळ अष्टमी” असते त्यांनी यादिवशी उपवास करावा . श्रीकृष्णाचा रात्री १२ वाजता जन्म समारंभ साजरा करावा व दुसरे दिवशी पारणे करावे . प्रथम मातीचे गोकुळ तयार करावे . त्यासाठी काळी माती आणून चाळून भिजवून ठेवावी . आधी पाळणा तयार करावा. त्यात बळीराम,श्रीकृष्ण”(Shree Krishna) तयार करून पाळण्यात निजवावे . तोडे , साखळ्या यासारखे मातीचे तयार केलेले दागिने घालावेत . पाटावर ताटाभोवती रांगोळी काढून हळद-कुंकू वहावे .बाळकृष्णाच्या प्रतिमेचे पुजन करतात.खालील साहित्य वापरून मनोभावे पुजा करावी



Poojaandsahitya
Shree Krishan


पुजा साहित्य / पुजा विधी :


२ गेजवस्त्र २ जानवी फणी ,करंडा, मंगळसुत्र ,खण तसेच देवातील बाळकृष्ण पुजेकरिता ठेवावा . २ बांगड्या, पंचामृत , पुजेचे साहित्य ,सुंठ, साखर,व खोबरे यांचा सुंठवडा ,तसेच डिंकाचा प्रसाद करावा ,प्रसादाकरिता केळ किंवा पेरू यांपैकी फळ आणावे . पुजा झाल्यावर “श्रीकृष्णाचा” पाळणा म्हणून आरती करून सुंठवडा वाटावा . बायकांना हळद -कुंकू दयावे . “गोकुळाष्टमीच्या” पारण्याला दही पोह्याचा नैवेद्य दाखवावा. गोकुळ अष्टमीचा दुसरा दिवस हा सार्वजनिक सण मोठ्या प्रमाणावर साजरा करतात.

We are at poojaandsahitya.com  providing  our best services in Poojasahitya and Online Booking of Pandit for Pooja.on the occasion of "Shravan" and especially for Mangalagaur u can book Paramparik Khel for more information visit us at poojaandsahitya.com



No comments:

Post a Comment