
कोजागिरी पौर्णिमा...!!!!
को जागरती = कोण जागं आहे !....
अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक अतीशय महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा.पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे 'कोजागरी पोर्णिमा' अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे.हा उत्सव अश्विन शु. पोर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेरयांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी असतात त्यांना अमृताचा (दुध) नवैद्य लागतो.* पूजाविधी मांडणी :- मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर १) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी २) विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा.अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२:३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.४) चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाचा एक छोटा भरीव गोल बनवावा.५) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावीऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यू भयI शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा IIदुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपारी जपून ठेवून दरवर्षी पुजाव्यात. कोजागारीस त्यांची पूजा करावी. १२ ते १२:३० या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावीत्यात गायत्री या मंत्राचा १ माळ जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र, प्रत्येक १ माळ जप करावा, तसेच १ वेळा स्त्री सुक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र १ वेळा व गीतेचा १५ वा अध्याय वाचावा.हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा! लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी हि परमदयाळू आहे. कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.या मोठ्या बहिणीस अक्काबाई' म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की 'अक्काबाईचा फेरा आला' हि अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे कोण जागे आहे. ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? *कोजागर्ती? यावरून या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो *कोजागरती असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले
We @poojaandsahitya.com offering you our user friendly services which can help you to follow all the traditions & rituals even with your busy schedule.You can buy Puja sahitya kit online or you can arrange any pooja with our Online Booking Pandit / Brahmin facility.
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनु्ष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे.
#Poojaandsahitya
#Saptshati #Path / #सप्तशती #पाठ
#Durgashtami #Pooja / #दुर्गाष्टमी #पूजा
आज चे पंचांग
दिनांक : १९ सप्टेंबर २०१६
वार : सोमवार
दिवस : १६ प . प्रतिकुल दिवस
महिना / पक्ष : भाद्रपद कृष्णपक्ष
तिथी : अश्विनी समाप्ती २२:२९
आज संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय : ८ वाजून ४५ मिनिट
#Poojaandsahitya
#pune
पितृपक्ष
आज दिनांक १७ सप्टेंबर २०१६ म्हणजेच मराठी कॅलेंडरनुसार भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद वद्य अमावस्या या काळात पक्ष करण्याची प्रथा आहे .यालाच पक्ष पंधरवडा म्हणतात .ज्या पुरुषाचे वडील ज्या तिथीला स्वर्गवासी झाले असतील त्या तिथीदिवशी वरील दिवसात पक्ष करतात . वरीलप्रमाणे प्रमाणे पक्ष करणे न जमल्यास काही अडचण आल्यास ,सर्वपित्री अमावास्येला पक्ष करावा . यादिवशी दोन ब्राह्मण व एक सवाष्ण सांगावी . सवाष्ण सांगायचे कारण म्हणजे घरात कोणी ना कोणीतरी स्त्री सवाष्ण गेलेली असते .पाच गोविंद विडे करावे. बाकी सर्व तयारी श्राद्धप्रमाणेच करावी .ब्राह्मण जेवावयास बसल्यावरच मीठ वाढावे .शेवटी वरणभात वाढल्यानंतर काहीही वाढायचे नाही .श्राद्ध पक्षाच्यावेळी भस्म व सातू लागतो . सातू नसल्यास गहू असले असले तरी चालतात .पक्षाचे वेळी सपिंड पक्ष करावयाचा असेल तर घरातील गेलेल्या प्रत्येक माणसाचा पिंड तयार करतात .त्यात लहान मुले बाले येत नाहीत .पिंडासाठी भात करावयाचा तो भात स्वतंत्र करावा . एखाद्या पुरुषाची आई , वडील ,आजोबा ,आजी ,मामी ,बहीण ,भाऊ ,काका ,काकू ,सासु ,सासरा थोडक्यात म्हणजे यांपैकी जवळचे नातेवाईक गेले असतील त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने पिंड तयार करतात .अशाप्रकारे पितृपक्षात आपल्या आप्तजनांचे स्मरण व्हावे हा त्यामागील हेतू असतो.
We are poojaandsahitya.com offering you all the ritual pooja sahitya or pooja samagri with all its pure form which is required to perform the Pitrupaksh/Paksh/Shradhh.You can book Guruji or Pandit for this.For more information visit our website all call directly on 8087758080