Saturday, 17 September 2016

Pitrupaksh

पितृपक्ष

आज दिनांक  १७ सप्टेंबर २०१६ म्हणजेच मराठी कॅलेंडरनुसार भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद वद्य अमावस्या या काळात पक्ष करण्याची प्रथा आहे .यालाच पक्ष पंधरवडा म्हणतात .ज्या पुरुषाचे वडील ज्या तिथीला स्वर्गवासी झाले असतील त्या तिथीदिवशी वरील दिवसात पक्ष करतात . वरीलप्रमाणे  प्रमाणे पक्ष करणे न जमल्यास काही अडचण आल्यास ,सर्वपित्री अमावास्येला पक्ष करावा . यादिवशी दोन ब्राह्मण व एक सवाष्ण सांगावी . सवाष्ण सांगायचे कारण म्हणजे घरात कोणी ना कोणीतरी स्त्री सवाष्ण गेलेली असते .पाच गोविंद विडे करावे. बाकी सर्व तयारी श्राद्धप्रमाणेच करावी .ब्राह्मण जेवावयास बसल्यावरच मीठ वाढावे .शेवटी वरणभात वाढल्यानंतर काहीही वाढायचे नाही .श्राद्ध पक्षाच्यावेळी भस्म व सातू लागतो . सातू नसल्यास गहू असले असले तरी चालतात .पक्षाचे वेळी सपिंड पक्ष करावयाचा असेल तर घरातील गेलेल्या प्रत्येक माणसाचा पिंड तयार करतात .त्यात लहान मुले बाले येत नाहीत .पिंडासाठी भात करावयाचा तो भात स्वतंत्र करावा . एखाद्या पुरुषाची आई , वडील ,आजोबा ,आजी ,मामी ,बहीण ,भाऊ ,काका ,काकू ,सासु ,सासरा थोडक्यात म्हणजे यांपैकी जवळचे नातेवाईक गेले असतील त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने पिंड तयार करतात .अशाप्रकारे पितृपक्षात आपल्या आप्तजनांचे स्मरण व्हावे हा त्यामागील हेतू असतो. 

      We are poojaandsahitya.com offering you all the ritual pooja sahitya or pooja samagri with all its pure form which is required to perform the Pitrupaksh/Paksh/Shradhh.You can book Guruji or Pandit for this.For more information visit our website all call directly on 8087758080


No comments:

Post a Comment